
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या बाजारपेठेतील कोसळलेल्या नाल्याच्या बांधकामाला तब्बल १७ लाख ५ हजार ४४२ रूपये निधी खर्च झाला. या कामाला तीन वर्ष लागली. एवढ्याश्या नाल्याच्या स्लॅबसाठी १७ लाख लागत असतील तर भाजी मंडईच्या नुतनीकरणासंंदर्भात मंजूर झालेल्या निधीतून 'लंगोट' तरी प्रशासन खरेदी करू शकेल का ? असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक शब्बीर मणियार यांनी करत न.प. प्रशासनाकडून केलेल्या या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.