
सावंतवाडी : शहरातील गटार व पाऊस पाण्याने तुंबणाऱ्या रस्त्यांची डागडुजी व जुनाट वृक्ष पावसाळ्यापूर्वी हटवण्यात यावे अशी मागणी माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे केली. सावंतवाडी शहरांत अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबून पादचारी व वाहन चालक यांना प्रवास करणं नामुष्की होते. ही ठिकाणे न.प. अधिकारी, कर्मचारी यांना ज्ञात असून या ठिकाणी बांधकाम खात्याच्या मदतीने डागडुजी विषयक आवश्यक ती सर्व कामे अग्रक्रमाने करण गरजेचं आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी धोकादायक जुनाट वृक्ष कधीही पडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. व प्रसंगी विद्युत वाहिनीवर वृक्ष पडल्यास विजेची समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात भेडसावणार असल्याने ती पावसापूर्वी तातडीने तोडणे गरजेचं आहे.सावंतवाडी शहरात अद्याप पर्यंत गटार सफाई व नाले सफाई कामे हाती घेतलेली नाही. पावसाळा अगदी नजीक येऊन ठेपलेला असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी व नागरिकांना नाहक त्रास होऊ नये याकरिता सर्व कामे त्वरित तातडीने करण्यात यावी अशी मागणी अँड. परिमल नाईक यांनी केली आहे.