
दोडामार्ग : मुसळधार पडणाऱ्या पावसाने दोडामार्ग तिलारी मार्गावरील साटेली भेडशी येथील मुख्य मार्गाला नदीचे स्वरूप आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गटार माती दगडामुळे बंद झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे येथील दुकानात घरामध्ये पाणी जात असल्यामुळे इथल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागने दोन दिवसात सदरचे गटार खुले करावे अशी मागणी साटेली भेडशी येथील व्यापाऱ्यांनी केली आहे.
दोडामार्ग तिलारी मार्गाच्या दोन्ही बाजूचे गटार सपात झाल्यामुळे पावसाचे पाणी ठीक ठिकाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. पावसाच्या पाण्यामुळे गटारातील माती, चिखल, कचरा रस्त्यावर साचल्यामुळे वाहन चालक व पादचारी यांना येजा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. साटेली भेडशी संपूर्ण बाजारपेठ रस्त्याच्या बाजूचे काही गटार सपाट झाल्यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी कचरा पूर्णतः रस्त्यावरून वाहत आहे. यां मुळे येथील दुकानदारांच्या दुकानात पाणी जाते त्यामुळे दुकानदार यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देऊन दोन दिवसात सदरचे गटार खुले करावें अशी मागणी यावेळी साटेली भेडशी येथील व्यापाऱ्यांनी केली आहे.