
कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे.गरोदर मातांना बाहेर उपचारासाठी का पाठवता ?सोनोग्राफी मशीन आहे? मग डॉक्टर कोण देणार ? ओपीडी करणेसाठी डॉक्टरांना शोधावे का लागते ? या रुग्णालयाचे स्थानिक आमदार नितेश राणे रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष आहेत ,ते काय करताहेत? रुग्ण सेवा देता येत नसेल तर रुग्णालयाला टाळे ठोका असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध इंगळे,रुग्णालय अधीक्षक डॉ.अनिकेत किर्लोस्कर यांना दिला.दरम्यान डॉ.इंगळे यांनी डॉक्टरांना ओपीडी करण्यासाठी टायमिंग निश्चित केला जाईल, गरोदर मातांना इथेच उपचार दिले जातील,भूलतज्ज्ञ सेवेत असतील असे लेखी आश्वासन दिले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले.या धरणे आंदोलनामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, शहर प्रमुख प्रमोद शेठ मसुरकर अनुप वारंग,युवा सेना शहर प्रमुख आदित्य सापळे,हरकुळ सरपंच आनंद ठाकूर, बेनी डिसोजा,वैदेही गुडेकर,दिव्या साळगावकर, माधवी दळवी, संजना कोलते, धनश्री मेस्त्री, युवा सेना उपशहर प्रमुख वैभव मालंडकर, संजय पारकर, जय शेट्ये, ललित घाडीगावकर, तात्या निकम, युवासेना जानवली विभाग प्रमुख किरण वर्दम, भालचंद्र दळवी, गौरव हर्णे माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, अमोल राणे, काका राणे, संतोष परब, अमेय पारकर आदि उपस्थित होते.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सध्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली. आहे रुग्णालयात ३० अधिपरीचारीका पदे मंजूर आहेत. त्यापैकी २१ पदे भरण्यात आली आहेत.त्यापैकी ६ जणांची बदली झाली असल्यामुळे कायमस्वरूपी १५ अधिपरीचारीका आहेत. त्यांची बदली झाली आहे. त्या जागी अजून दुसरे कर्मचारी हजर झाले नाहीत. रुग्णालयात कायमस्वरूपी स्त्री रोगतज्ज्ञ व
भुलतज्ज्ञ हे पद रिक्त आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या सर्जरी होऊ शकत नाही. गोरगरीब रूग्णाला खासगी दवाखान्यात जावे लागते. आस्थापना विभाग मध्ये वरीष्ठ लिपिक हे पद व इतर पदे रिक्त झाली आहेत. त्याठिकाणी ८ पदे मंजूर असून ७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांवर अद्याप कोणतेही कर्मचारी दिले नसल्याचा आरोप सतीश सावंत,शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उत्तम लोके,कन्हैया पारकर यांनी केला.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना गेल्या महिन्यात २६ जणांना रेफर का केले?डॉक्टर आहेत ना? मग बाहेर गोरगरीब रुग्णांना का पाठवले जाते ?अशी विचारणा कन्हैया पारकर यांनी केली. भूल तज्ज्ञ नाहीत तर ऑपरेशन कसे होणार? सोनोग्राफी मशीन आहे?डॉक्टर बदली झाल्यामुळे सेवा ठप्प झाली.जागा रिक्त आहे, रुग्णालयाला टाळे घाला अशी मागणी सतीश सावंत यांनी केली.
जे डॉक्टर सेवेत आहेत त्यांना ओपीडी करण्यासाठी वेळ ठरवून द्या,भात कापणी आहे त्यामुळे साथ पसरणार याला जबाबदार कोण?यंत्रणा नसेल तर आम्ही काय करणार?असा सवाल सतीश सावंत यांनी केला.
त्यावर निवासी जिल्हा वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे डॉ. अनिकेत किर्लोसकर यांनी महिन्यातून दोनदा सोनोग्राफी तपासणी होईल,ओपीडी करण्यासाठी डॉक्टरांना वेळ ठरवून दिली जाईल,सुरक्षा रक्षक प्रतिनियुक्तीवर पाठवले आहे ती रद्द केली जाईल.नव्याने एक लिपिक दिला जाईल.रक्त तपासणी २४ तासात करुन दिली जाईल,असे लेखी आश्वासन दिले.
यावेळी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला.पोलिस निरिक्षक अमित यादव , पोलिस उपनिरिक्षक शरद जेठे , वाहतूक पोलीस विनोद चव्हाण , महिला पोलिस स्नेहा राणे , किरण मेथे , अमित खाडये ,मंगेश बावदाने आदी उपस्थित होते.