चाकरमान्यांनो खासगी बसच्या तिकिटाचे रेट पाहिलात का ?

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 13, 2023 15:27 PM
views 2251  views

कणकवली : गणेश चतुर्थी निमित्त गावी येणाऱ्या  गणेश भक्तांना घरी येणे - जाणे खूप महागाईत पडत आहे. कारण मुंबईतून कणकवलीत येण्यासाठी 15 ते 19 सप्टेंबर पर्यंत खासगी साध्या बसचे सीटिंगचे दर 1500 ते 2000 रुपये पर्यंत पोचले आहेत. स्लीपरचे तिकिट 3000 च्या वर आहे. तसेच कणकवली वरून पुन्हा मुंबईला जाण्यासाठी 18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर पर्यंत हेच दर या खाजगी बस चालकांनी ऑनलाईन पद्धतीने आकारण्यास सुरुवात केली आहे.


त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्गच्यावतीने खासगी बस चालकांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या तिकिटा पेक्षा दीडपट तिकीट करण्याची परवानगी दिली आहे. त्यामध्ये कणकवलीतून मुंबईला जाण्यासाठी 800 ते 900 रुपये साध्या बस तिकीट व स्लीपर चे तिकीट 1100 ते 1500 असणे अपेक्षित आहे. पण आता या खाजगी बस कंपन्यांनी ऑनलाइन पद्धतीने  गणेशोत्सव काळात दाम दुप्पट भाडे आकारण्यास सुरुवात केली असल्याने  सिंधुदुर्गच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कोणती कारवाई करणार याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.