वरिष्ठ लिपिक डुमिंग आल्मेडा सेवानिवृत्त !

सावंतवाडी नगरपरिषदेच्यावतीने गौरव
Edited by: विनायक गांवस
Published on: January 03, 2024 12:15 PM
views 203  views

सावंतवाडी : नगरपरिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ लिपिक डुमिंग आल्मेडा हे नियत वयोमानानुसार ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आज नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता शिवप्रसाद कुडपकर,सहा.कार्यालय निरीक्षक सौ. आसावरी केळबाईकर, नगरपरिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष देविदास आडारकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ,सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.


श्री.आल्मेडा यांचे बाबत सौ. आसावरी केळबाईकर, सौ. रसिका नाडकर्णी,गजानन परब,  एकनाथ पाटील,दीपक म्हापसेकर,डॉ. उमेश मसुरकर, सौ. परविन शेख, भरत लाखे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक देविदास आडारकर यांनी केले. या कार्यक्रमास नगरपरीषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमास सत्कारमुर्ती आल्मेडा यांच्या पत्नी व कन्या उपस्थित होत्या. शेवटी संघटना सचिव टि पी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.