
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त वीज कर्मचारी ज्येष्ठ नागरिक संघ सांगेली यांच्यावतीने महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांना पाठिंबा दिला आहे. ही संस्था जिल्ह्यातील सेवानिवृत्त वीज कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणार्थ सतत झटणारी संस्था आहे.यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, अध्यक्ष सुधाकर गावडे उपाध्यक्ष विष्णू परब सचिव महादेव राऊळ मेघा शाम तावडे सूर्यकांत परब आदी उपस्थित होते.