
वैभववाडी : एडगाव बौध्दवाडी येथील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते धोंडीराम सोनू तांबे यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबई पोट्रर्समधून सेवानिवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर वडिलोपार्जित शेती करीत स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले होते. वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघांच्या स्थापनपासून ते एक सक्रिय, प्रामाणिक कार्यकर्ते होते. त्यांच्या पत्नी भाऊ पुतणे, बहीण भाचे असा परिवार आहे.