सेम्परट्रान्स कंपनीचा वर्धापन दिन उत्साहात

Edited by:
Published on: November 05, 2023 14:30 PM
views 73  views

रायगड : रूपेश रटाटे | सेम्परट्रान्स प्रा.इंडिया लिमिटेड कंपनीचा वर्धापन दिन ३ नोव्हेंबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी कंपनीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीलाच  कंपनीच्या आवारात प्रेवश केल्या नंतर आकर्षक सुबक रांगोळी, रंगीबेरंगी फुलांनी सजावट मनाला वेगळीच  भुरळ पाडत होती.सकाळी  ८.३० वाजता सत्यनारायणाच्या पूजेचा सुरुवात करण्यात आली. विधिवत पूजा करण्यासाठी पुरोहित श्री प्रकाश स्वामी जंगम यांनी सुरुवात केली.

पूजेचा मान हा कामगार वर्गातील श्री गोपाळ खरीवळे यांना देण्यात आला होता.विधिवत पूजा पार पडल्यानंतर सर्व कामगार, स्टाफ एकत्रित येऊन महाआरती करण्यात आली होती.अध्यक्ष श्री गितेश रटाटे यांच्या उपस्थिती मध्ये संपूर्ण कमिटी सदस्य, कामगार वर्ग एकत्रित येऊन युनियन फळकास फगवे झेंडे , हार श्रीफळ वाढून पूजा करण्यात आली. कामगार वर्गातील भजनाची आवड असलेले कामगार ऐकत्रित  येऊन संगीत भजन सादर करण्यात आले.

सायंकाळी ५ वाजे च्या सुमारास कामगार वर्गातील कुटुंबीय येण्यास सुरुवात झाली. प्रत्येक कामगारांनी आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना कंपनीच्या आवारात फेरफटका मारून मुख्य कार्यक्रमाच्या व्यासपीठासामोरे आसनस्थ होऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. व्यासपीठावर उपस्थित कंपनी व्यवस्थापनाचे प्रोडक्शन मॅनेजर श्री देवेंद्र नाईक , एच आर विभागात प्रमुख पदावर कार्यरत असणारे श्री सचिन सिंदखेडेकर ,श्री सुदाम वनारसे,   प्रियांका दाते मॅडम, इंजिनियरिंग हेड श्री किरण मोरे सेफ्टी मॅनेजर श्री सत्यदेव पांडे, श्री.रजा शहा  आदि स्टाफ उपस्थित होते तर कामगार वर्गातून युनियन अध्यक्ष श्री गीतेश रटाटे, सचिव श्री नितेश बामुगडे, उपसचिव कु .मिथुन मालुसरे ,खजिनदार श्री मनोज भोकटे, सह खजिनदार श्री निलेश भोकटे,सदस्य श्री दिलीप कडव , महेंद्र दिघे आदि मान्यवर उपस्थित होते.आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात , सांस्कृतिक, कला, रांगोळी, सेफ्टी पोस्टर , संगीत खुर्ची असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आले तर वर्धापन दिनाचे मुख्य आकर्षण असलेल्या वेसावकर मंडळींचा परंपरा वेसावकरणाची आगरी कोळी गाण्याची मेजवानीने सगळ्यांचं आकर्षित केले. विविध वेशभूषा,लावली , समाज प्रबोधन, धार्मिक सादरीकरण एकाच मंचावर पाहायला मिळाले. कंपनी व्यवस्थापन कामगार वर्गात एकत्रित काम करण्याच्या कार्यपद्धती मुळे असे मोठं मोठे कार्यक्रम यशस्वी होऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे सेम्परट्रान्स प्रा.इंडिया लिमिटेड कंपनी आहे असे विविध स्तरावरून बोलले जात आहे.