वेंगुर्ले शहर विकासाच्या संकल्पना विषयावर रविवारी चर्चासत्र

Edited by: दिपेश परब
Published on: October 18, 2025 19:36 PM
views 19  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले शहर नागरी कृती समिती या अराजकीय संस्थेच्या पुढाकाराने व शहरातील सर्व समविचारी नागरिकांच्या सहकार्याने "शहर विकासाच्या संकल्पना" या विषयावर नाविन्यपूर्ण चर्चासत्र रविवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ठीक ३ ते ५ या वेळेत नगर वाचनालय, वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आले आहे

सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वेंगुर्ले शहर पुढील ५ वर्षात म्हणजे २०३१ पर्यंत कसे असावे यावर शहरातील कोणताही नागरिक आणि जागरूक मतदार स्वतःची परखड मते व्यासपीठावर खुलेपणाने व्यक्त करू शकतो. प्रत्येक सहभागी व्यक्तीला ३ मिनिटाचा वेळ निश्चित करण्यात आला असून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत स्वतःची नावनोंदणी 9422434356, 9423301354, 9921530274 या नंबरवर करावी. सदरील उपक्रमात प्रथम २५ नोंदणी केलेल्या नागरिकांनाच व्यक्त होण्याची संधी मिळणार असून यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. लवकरच नगर परिषदेच्या निवडणुका होणार असून इच्छुक नगराध्यक्ष तसेच नगरसेवक उमेदवारांना स्वतःचे व्हिजन तमाम नागरिकांसमोर मांडण्याची सुसंधी या उपक्रमामुळे प्राप्त झाली आहे. वेंगुर्ले शहरातील सुजाण, सतर्क, जागरूक, बुद्धिजीवी आणि सुशिक्षित नागरिक तथा मतदारांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन वेंगुर्ले शहर नागरी कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.