स्व. मंदा टेंबकर स्मरणार्थ आयोजित निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण | कोमसापच्या कार्यक्रमात गौरव

Edited by: विनायक गावस
Published on: March 15, 2024 11:47 AM
views 99  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्यावतीनं स्व.प्रा ‌मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जाहीर करण्यात आलेले पुरस्कार  निवेदक, आदर्श शिक्षक प्रा. संजय कात्रे यांना प्रदान करण्यात आला. तर कै.ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार साहित्यिक, नाटककार, पत्रकार आणि मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतिश पाटणकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर दोन गटात आयोजित केलेल्या निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. ही स्पर्धा पत्रकार अमोल टेंबकर यांच्या मातोश्री स्व. सौ.मंदा टेंबकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती‌. 

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आलं. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी पहिल्या गटातील  प्रथम महेश रुपेश कातळकर, मळगाव हायस्कूल, द्वितीय तन्वी प्रसाद दळवी, राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी, तृतीय आर्या प्रकाश सावळ, मळगाव प्राथमिक शाळा सावळवाडा व उत्तेजनार्थ बक्षीस अक्षरा अनिल राऊळ, शिरशिंगे प्राथमिक शाळा २ आणि सानवी रवींद्र सावंत, सुधाताई कामत विद्यामंदिर सावंतवाडी यांना प्रमाणात व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच इयत्ता आठवी ते नववी मोठा गटातील प्रथम श्रुती शिवाजी पोपकर  इन्सुली हायस्कूल, द्वितीय श्रावणी राजन सावंत, कलंबिस्त हायस्कूल, तृतीय कृष्णा महेश पास्ते, मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी व उत्तेजनार्थ बक्षीस ज्ञानेश्वरी नकुल सावंत, माजगाव हायस्कूल यांचा सन्मान करण्यात आला. ही स्पर्धा पत्रकार अमोल टेंबकर यांच्या मातोश्री स्व. सौ.मंदा टेंबकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती‌.  

यावेळी मनोगत व्यक्त करताना पत्रकार अमोल टेंबकर यांनी कोमसापचे आभार व्यक्त केले. आपल्या आईच्या नावानं पुढील वर्षीपासून पुरस्कार देण्यात यावा व तो पत्रकारितेत कार्य करणाऱ्या व्यक्तीला द्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केल. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, सावंतवाडी न.प.मुख्याधिकारी सागर साळुंखे, माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक, सौ. उषा परब, कोमसाप अध्यक्ष अँड. संतोष सावंत, डॉ. जी. ए.बुवा, प्रा‌. विजयप्रकाश आकेरकर, अमोल टेंबकर, दीपाली नेवगी, अनिल भोसले, अमोल सावंत, चंद्रकांत सावंत, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, अँड. अरूण पणदुरकर, अँड. नकुल पार्सेकर, भरत गावडे, दीपक तुपकर, दीपक पटेकर, चंद्रकांत कात्रे, सौ.‌संपदा कात्रे, विनायक गांवस, नीरज भोसले, मंगेश मेस्त्री, सर्वेश राऊळ, नितेश देसाई, भुवन नाईक, कमलाकर कळंगुटकर, महेश पास्ते, प्राची दळवी, भाई साटेलकर, श्री. धुरी आदी उपस्थित होते.