विद्यार्थीनींसाठी स्व-संरक्षण प्रशिक्षण

Edited by: विनायक गावस
Published on: December 12, 2023 19:44 PM
views 96  views

सावंतवाडी : अर्चना फाऊंडेशनच्यावतीने शालेय विद्यार्थीनींसाठी खास स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अणसूर-पाल हायस्कुल, अणसूर येथील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. सावंतवाडी येथील "सिंधू सावलीन मार्शल आर्ट" चे दिनेश जाधव यांनी आपले सहकाऱ्यांसह स्व-संरक्षणाचे प्रात्यक्षिक सादर करत उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

याबद्दल अर्चना घारे-परब यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. मांसाहेब जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श डोळ्यांसार ठेवत मुलींनी स्वतःच्या रक्षणासाठी सदैव सक्षम व तत्पर असले पाहिजे अशी भावनाही घारे यांनी व्यक्त केली.यावेळी पाल उपसरपंच प्रीती गावडे, राष्ट्रवादीचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, महिला प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल, वेंगुर्ले शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. संजीय लिंगवत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ युवक अध्यक्ष विवेक गवस, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत गावडे, युवासेनेचे सागर नानोस्कर, शिवप्रेमी साईराज गोडकर, मुख्याध्यापक राजेशजी घाटवळ, बबन पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.