सावंतवाडी राजवाड्यात महिलांना स्वसंरक्षणाचे धडे

Edited by: विनायक गांवस
Published on: August 22, 2024 14:00 PM
views 142  views

सावंतवाडी : रोट्रॅक्टर युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले आणि रोट्रॅक क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या वतीने सावंतवाडीत महिलांसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर महिलांसाठी असून पूर्णपणे मोफत आहे. दिनांक 28 ते 30 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 12 वाजता या वेळेत सावंतवाडी राजवाडा येथे घेण्यात येणार आहे. तसेच या शिबिरात सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. 

या शिबिरात महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी सिंधुदुर्ग जिल्हा जुडो कराटे आकीदो असोसिएशन सावंतवाडीचे प्रशिक्षक दिनेश जाधव स्वसंरक्षणातील बारकावे शिकवणार आहेत. सहभागी होण्यासाठी 9823040288 यावर संपर्क करावा. तरी जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे