
सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रध्दाराजे भोसले आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने संस्थानकालीन सावंतवाडी राजवाड्यात महिलांसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर महिलांसाठी पूर्णपणे मोफत असून २८ ऑगस्ट रोजी या शिबिराचा शुभारंभ झाला.
सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रध्दाराजे भोसले आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने संस्थानकालीन सावंतवाडी राजवाड्यात महिलांसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी राजवाडा येथे २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत शिबीर संपन्न झालं. या शिबिरात सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नव्हती. यातून महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले गेले. या शिबिरासाठी सिंधुदुर्ग जिल्हा जुडो कराटे आकीदो असोसिएशन सावंतवाडीचे प्रशिक्षक दिनेश जाधव यांनी स्वसंरक्षणातील बारकावे शिकवले. स्वतः युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी या शिबिरात सहभाग घेतला. मोठ्या संख्येने युवती, महिला वर्गाने याचा लाभ घेतला.