
सावंतवाडी : माडखोल येथील शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष औषध निर्माणशास्त्र ( बी. फार्मसी ) मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अनिकेत धुळप याची NIPER (National Institute of Pharmaceutical Education And Research) हाजीपुर बिहार येथे तसेच अनिकेत मेलवणे ICT- IOC ( Institute Of Chemical Technology) भुवनेश्वर ( ओडिसा) मध्ये एम फार्मसी साठी निवड झालेबदल व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोलचे प्रेरणास्थान डॉ. वेदप्रकाश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील सर प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.