
सावंतवाडी : उमेश उर्फ अभिषेक प्रसाद सावंत यांची महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडाच्या सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदी स्तुत्य निवड झाली आहे.
मुंबई, नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या म्हाडाच्या वांद्रे येथील मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ या कार्यालयाकरिता निवड झाल्याचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले.
उमेश सावंत यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.