नेमळे विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड!

Edited by: रुपेश पाटील
Published on: December 20, 2022 20:10 PM
views 327  views

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित क्रीडा संकूल ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात सोहम राजन मडवळ या विद्यार्थ्यांने गोळा फेक स्पर्धेत ९.५५ मीटर गोळाफेक करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. पांडुरंग संताजी पाटकर या विद्यार्थ्यांने थाळी फेक स्पर्धेत २७.७२ मीटर थाळी फेकून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी या दोन विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल नेमळे पंचक्रोशी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, प्राचार्य कल्पना बोवलेकर, माजी प्राचार्य किरण बेटे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक आर. के. राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.