देवगड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय थल सैनिक कॅम्पसाठी निवड

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 14, 2025 20:58 PM
views 37  views

देवगड : देवगड महाविद्यालयाच्या संभाजी जकाप्पा माने, मयुरेश सुनील पुजारे यांची राज्यस्तरीय थल सैनिक कॅम्पसाठी निवड करण्यात आली आहे. ५८ महाराष्ट्र बटालियन ओरोस येथे गेले दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एन. सी. सी. प्रशिक्षण कॅम्पमधून आणि चाचण्यांमधून सार्जंट संभाजी जकाप्पा माने (हिंदळे) आणि लान्स कॉर्पोरल मयुरेश सुनील पुजारे (मुणगे) यांची राज्यस्तरीय थल सैनिक कॅम्पसाठी निवड झाली आहे.

सार्जंट संभाजी मॅप रीडिंग या स्पर्धाप्रकरात पुढील प्रशिक्षणासाठी यवतमाळ येथे जाणार असून लान्स कॉर्पोरल मयुरेश हा ऑब्स्टेकल कोर्स या प्रकारासाठी अमरावती येथे जाणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे कॅडेट्स ओरोस येथील प्रशिक्षणामध्ये सहभागी होते. एन.सी.सी. ऑफिसर लेफ्ट. सुनेत्रा ढेरे आणि ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, ॲडम. ऑफिसर लेफ्ट. कर्नल तनुज मंडलिक, सर्व आर्मी पी.आय. प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले. देवगड महाविद्यालयाच्या एन. सी. सी. युनिटसाठी ही अभिमानाची बाब असून या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या संस्था पदाधिकाऱ्यांकडून, प्राचार्य, प्राध्यापकव कर्मचारी यांच्याकडून या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.