कॅम्पस इंटरव्यूमध्ये SPK च्या विद्यार्थ्यांची निवड

Edited by:
Published on: March 16, 2025 14:42 PM
views 74  views

सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालयामधील रसायनशास्त्र विभागाने युनिकेम प्रायव्हेट लिमिटेड, गोवा कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन  केले होते, यामध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी तसेच एस. आर. एम. कॉलेज, कुडाळ यातील चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 

कंपनीच्या क्वालिटी कंट्रोलचे मॅनेजर प्रशांत पेडणेकर व एच आर  विभागाचे सीनियर ऑफिसर चार्ल्स मार्टिन यांनी एम एस्ससी केमिस्ट्री च्या २९ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा,  राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले  यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेचे सदस्य डॉ. सतीश सावंत, जयप्रकाश सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, वरिष्ठ प्राध्यापक  प्रा.एम ए ठाकूर, एम एस्ससी केमिस्ट्री चे समन्वयक प्रा. डी डी गोडकर, रसायन शास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. डी बी शिंदे तसेच माजी विद्यार्थी श्री प्रवीण धुरी उपस्थित होते. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग व कॉलेजचे प्लेसमेंट सेल अशाप्रकारे अनेक कंपन्यांचे महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यू आयोजित करून रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत असतात.

यामध्ये विशेष करून लक्ष्मी ऑरगॅनिक, फिनोलेक्स, सिपला, व्हीनस इथॉक्सि इथर, निकोमेट, तेवा फार्मा, गणेशा पर्सनल केअर प्रॉडक्ट, सांडू या विविध कंपन्यांमध्ये इंटरव्यूच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळते. या कंपन्यांमध्ये रसायनशास्त्र विभागाचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. यावेळी वरिष्ठ अधिकारी चार्ल्स मार्टिन यांनी, सध्या आपल्या कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. त्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्यू घेताना प्रथम प्राधान्य देतो असे सांगितले. कॉलिटी कंट्रोलचे मॅनेजर प्रशांत पेडणेकर यांच्या प्रयत्नातून या कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन करण्यात आले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कुमार अद्वैत टोपले, कुमारी शिवांगी जोशी, कुमार गौरेश गावडे, कुमारी मृणाल फाटक, कुमार गौरेश राऊळ या एस. पी. के. च्या विद्यार्थ्यांची तसेच कुमार मंदार कोरगावकर, कुमार शुभम गोलम, कुमार प्रथमेश दळवी, व कुमार गौरव तेली या एस आर एम कॉलेज कुडाळ विद्यार्थीची निवड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता डॉ. यु.सी. पाटील डॉ. ए.पी निकुम, प्रा. डी के मळीक, प्रा. पी.एम धुरी प्रा. एस एस काळे, प्रा. एस एस पाटील, प्रा. पी.पी परब आदींनी परिश्रम घेतले.