आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्कारासाठी महेंद्र पटेल यांची निवड

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ वार्षिक अधिवेशनात होणार गौरव
Edited by: विनायक गांवस
Published on: March 15, 2023 16:25 PM
views 231  views

सावंतवाडी : ग्रंथालय चळवळीतील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने महेंद्र पटेल, श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांची आदर्श ग्रंथालय सेवक या जिल्हास्तरीय पुस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन रविवार दिनांक १९ मार्च २०२३ रोजी ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालय, गोवेरी ता. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थिती पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानपत्र आणि शाल श्रीफळ असे राहणार आहे.