तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी हनुमंत पेडणेकर यांची निवड

Edited by: विनायक गावस
Published on: June 27, 2023 10:27 AM
views 92  views

सावंतवाडी : तालुक्यातील सरपंच ,उपसरपंच यांची रविवार २५ जून २०२३ ला मळेवाड "राजगड रिसॉर्ट" येथे जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेसाठी तालुक्यातील ४२ सरपंच व ११ उपसरपंच उपस्थित होते.

नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांना जिल्हाध्यक्ष देसाई तालुकाध्यक्ष प्रमोद गावडे, जिल्हा संघटक सुरेश गावडे, तांबोळी गावचे माजी सरपंच अभिलाष देसाई यांनी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांना मार्गदर्शन करताना संघटनेचे महत्त्व समजावून सांगितले. सरपंच म्हणून काम करताना संघटनेची नितांत गरज आहे.

गेल्या पाच वर्षात संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न, समस्या तालुका ,जिल्हा ते राज्य शासन दरबारीपर्यंत पोचवण्याची व सोडवण्याचेही काम संघटनेच्या माध्यमातून केले गेले. CRZ, आपले सेवा सरकार, डाटा ऑपरेटर  मानधन,स्ट्रिट लाईट वीज बील, वन्यजीव प्राण्यांपासून होणारी शेती नुकसानी व मिळणारी तुटपुंजी भरपाई, अशा अनेक विषयांवर संघटित झाल्याने सरपंच म्हणून आपल्या गावातील  बाजू प्रभावीपणे मांडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.