LIVE UPDATES

सुरक्षारक्षकाचा सेवा बजावताना मृत्यू

Edited by: विनायक गांवस
Published on: June 13, 2025 21:07 PM
views 114  views

सावंतवाडी : शहरातील वनश्री अपार्टमेंट मधील सुरक्षारक्षकाचा सेवा बजावत असताना मृत्यू झाला. सुरेश विठोबा जाधव,  आंबेगाव-सावंतवाडी असे त्यांचे नाव असून आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

येथील वनश्री अपार्टमेंटमध्ये मयत व्यक्ती सुरक्षारक्षकाचे काम करत होती. सेवा देत असताना ते बेशुद्ध पडले. त्यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर उद्या सकाळी त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.