२९ ते ३१ मार्चला सुरु राहणार दुय्यम निबंधक कार्यालय

Edited by:
Published on: March 27, 2025 11:41 AM
views 206  views

सिंधुदुर्ग : येत्या आर्थिक वर्षात २९ ते ३१ मार्च रोजी शनिवार,  गुढीपाढवा, रमजान इर्द याच्या शासकीय सुट्ट्या येत असल्या तरी नागरिकांच्या सोयीसाठी या सुट्टीच्या दिवशी राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय चालू ठेवण्याचे निर्देश राज्याचे नोंदणी उपनिरीक्षक यांनी दिले आहेत. त्याब्बत २४ मार्च रोजीच पत्र सर्व सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे दिले आहेत. 

वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते दरवर्षी १ एप्रिल रोजी प्रसिध्द्र होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात, मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते. तसेच महत्वाच्या सणामुळे देखील दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे, हे लक्षात घेवून आणि आर्थिक वर्ष २४-२५ या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने २९ ते ३१ मार्च २५ या आर्थिक वर्षअखेर असलेल्या सुट्टीच्या दिवसात सर्व नोंदणी कार्यालये सुरु ठेवण्यात येत आहेत. या बाबतच्या सूचना आपले अधिनस्त असलेल्या सर्व दुय्यम निबंधक यांना आपले स्तरावरुन देण्यात याव्यात. 

 असे पत्र राज्याचे पुणे येथील नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी जिल्हा निबंधकांना पाठवले आहे. सुट्टीच्या कालावधीत कार्यालय सुरु असणार असल्याने नोंदणी करता येणार आहे. तरी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन दोडामार्गचे दुय्यम निबंधक श्री. वराडकर यांनी आवाहन केलं आहे.