
कुडाळ | भरत केसरकर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतपेढी निवडणूकीत १५ पैकी अकरा जागांवर विजय मिळवून शिक्षक भारतीने निर्विवाद सत्ता काबीज केली आहे. तर विद्यमान अध्यापक संघ व कास्ट्राईब शिक्षक संघटना पॅनलला केवळ चार जागांवर विजय मिळवता आला आहे. जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारतीने घवघवीत यश संपादन केले आहे.संजय वेतुरेकर यांनी ओबोसी गटातून अध्यापक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे यांचा पराभव करत त्यांना आसमान दाखवल आहे.तर कास्ट्राईब संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम हे अवघ्या दोन मतांनी निवडून आले आहेत.शिक्षक भारतीचे नवखे सुनील जाधव यांनी एकाकी झुंज देत चांगलीच लढत देत संदीप कदम यांना शेवटपर्यंत झुंजविले आहे.सुनिल जाधव यांचा पराभव जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या जिवारी लागून गेला आहे.
विजयी झालेल्या उमेदवारा मध्ये शिक्षक भारतीचे शरद देसाई-दोडामार्ग, प्रदीप सावंत-सावंतवाडी, सुमित मसूरकर-मालवण, रमाकांत नाईक- कुडाळ,सत्यपाल लाडगावकर- देवगड,संजय वेतुरेकर- ओबीसी, सुरेंद्र लांबोरे-एन.टी गट,समिर परब- जिल्हा खुला,स्वप्निल पाटील- जिल्हा खुला,सौ.सुमेधा नाईक महिला राखीव,सौ.विद्या शिरसाट- महिला राखीव ह्या अकरा जागांवर विजय मिळवला आहे.
तर अध्यापक संघाचे मारूती पुजारी- कणकवली,जयवंत पाटील- वैभववाडी,आशीष शिरोडकर- वेंगुर्ले हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.तर कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम हे अनुसूचित जाती मधून निवडून आले आहेत.
शिक्षक परिषद,शिक्षकेतर कर्मचारी,शिक्षक सेना पॅनलचा धुव्वा उडाला आहे.तर दिनेश म्हाडगुत यांच्या मराठा संघटना पॅनलचा धुव्वा उडाला आहे.तर शिक्षकेतर चे जिल्हाध्यक्ष अनिल राणे,मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश म्हाडगुत,अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे आणी शिक्षक सेनेचे कमलेश गोसावी हे चार जिल्हाध्यक्ष पराभूत झाले आहेत.