माध्यमिक - उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीची आज निवडणूक | ६२ उमेदवार रिंगणात

Edited by: भरत केसरकर
Published on: June 15, 2023 12:33 PM
views 148  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीची निवडणूक आज होत आहे. १५ जागांसाठी चार पॅनलचे ६० व दोन अपक्ष मिळून एकूण ६२ उमेदवार रिंगणात आहेत.आठ तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी ८ ते ४ यावेळेत मतदान होत आहे.आज शाळेचा पहिला दिवस असल्याने आणी मतदान असल्याने जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा सकाळ सत्रात भरविण्यात आल्या आहेत.तर उद्या मतमोजणी होणार आहे.

    ओबीसीसाठी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर विरूद्ध अध्यापक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे विरूद्ध शिवशाही पॅनलचे नारायण साळवी विरूद्ध विद्यासागर पॅनलचे विष्णू काणेकर विरूद्ध अपक्ष सूर्यकांत चव्हाण यांच्यात काटे की टक्कर होत आहे.

    तर खुल्या गटातून मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश म्हाडगुत,एकनाथ राऊळ विरूद्ध शिक्षक भारतीचे समिर परब,स्वप्निल पाटील विरूद्ध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,शिक्षक परिषद व शिक्षक सेना पॅनलचे अनिल राणे,किशोर सोन्सुरकर विरूद्ध अध्यापक संघाचे शिवराम सावंत,संदीप शिंदे विरूद्ध अपक्ष रूपेश नेवगी अशी काटे की टक्कर होत आहे.

    तर अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी विद्यमान पॅनलचे मावळते अध्यक्ष संदीप कदम यांच्या विरोधात शिक्षक भारती सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनलचे सुनिल जाधव यांनी मोठी ताकद उभी करत शड्ड्यु ठोकला आहे.तर या गटातून शिवशाही पॅनलचे आनंदा बामणीकर,विद्यासागरचे संदीप सावंत हे पण नशीब आजमावत आहे.

   भटक्या विमुक्त जाती जमाती च्या एक जागेसाठी शिक्षक भारतीचे सुरेंद्र लांबोरे विरूद्ध आदर्श सहकार पॅनलचे पांडुरंग काळे विरूद्ध विद्या सहकारचे पॅनलचे शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश गोसावी विरूद्ध शिवशाहीचे महादेव चौगुले अशी लढत होत आहे.

    तर महिलांच्या दोन राखीव जागांसाठी शिक्षक भारतीच्या सौ.विद्या शिरसाट,सुमेधा नाईक विरूद्ध आदर्श सहकार पॅनलच्या सौ.अश्विनी गर्जे,सौ.स्वप्नाली घावरे विरूद्ध विद्या सहकार पॅनलच्या सौ.धनश्री गावडे,सौ.सुविधा तावडे विरूद्ध शिवशाही परिवर्तन पॅनलच्या सौ.संगीता गावडे,सौ.सुषमा परब अशी लढत होत आहे.

      आठ तालुक्यातील लढती सुद्धा लक्षवेधी ठरत आहेत.यात कुडाळ तालुक्यातील माजी पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर हे आदर्श सहकार पॅनलमधून नशीब आजमावत आहेत.त्यांच्या विरोधात शिक्षक भारतीचे रमाकांत नाईक यांच मोठ आव्हान आहे.वेंगुर्ल्यातून अध्यापक संघाचे आशु शिरोडकर नशिब आजमावत आहेत.सावंतवाडीत शिक्षक भारतीचे प्रदीप सावंत नशिब आजमावत आहेत 

      शिक्षक भारतीचे संजय वेतुरेकर,मराठा संघटनेचे दिनेश म्हाडगुत,शिक्षक सेनेचे कमलेश गोसावी,अध्यापक संघाचे अजय शिंदे,शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अनिल राणे आणी कास्ट्राईब संघटनेचे संदीप कदम असे ६ जिल्हाध्यक्ष रिंगणात आहेत.