शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज दुसरी सुनावणी...!

Edited by:
Published on: September 25, 2023 15:22 PM
views 299  views

मुंबई : आमदार अपात्रतेप्रकरणी १४ सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज या प्रकरणातील दुसरी सुनावणी घेतली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने विलंबाबाबत कानउघाडणी केल्यानंतर आमदार अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आज, सोमवारपासून सुनावणी सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी सुनावणीचे प्रारूप किंवा रूपरेषा स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे. सुनावणीसाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून सर्वोच्च न्यायालयास त्याबाबतचे वेळापत्रक सादर केले जाणार आहे.