
सावंतवाडी : येथील उभाबाजार, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर रोडस्थित श्री देव पिंपळ मारुती मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन आणि श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा सोमवार ३० मार्च ते गुरुवार २ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
वर्धापन दिनानिमित्त दररोज सकाळी ९.०० वाजल्यापासून महागणपती पूजन, अभिषेक, महापूजा आणि आरती असे धार्मिक विधी पार पडणार आहेत. उत्सवाच्या मुख्य आकर्षणात सोमवार, ३० मार्च सकाळी वर्धापन दिन मुख्य पूजा. सायंकाळी ७.०० वाजता कु. अंकिता गावडे (कट्टा-मालवण) यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. मंगळवार, ३१ मार्च सायंकाळी ५.०० वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. रात्री ७.०० वाजता स्वप्नील म्हापसेकर व श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, ओटवणे यांचे भजन होईल. बुधवार, १ एप्रिल या दिवशी सकाळी श्री मारुतीरायांना विधिवत चांदीची प्रभावळ अर्पण केली जाणार आहे. रात्री ९.०० वाजता वेंगुर्ला येथील श्री धावडेश्वर भजन मंडळाचा कार्यक्रम होईल. गुरुवार, २ एप्रिल (हनुमान जन्मोत्सव) पहाटे ६.३० वाजता ह.भ.प. सौ. वर्षाराणी अभ्यंकर (मालवण) यांचे हनुमान जन्मोत्सव कीर्तन होईल. दुपारी २.०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, तर सायंकाळी ७.०० वाजता श्री गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ, वडखोल यांचे भजन होईल.गुरुवार, २ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिर, सावंतवाडी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मंगलमयी सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी सहकुटुंब, सहमित्र घ्यावा, असे आवाहन श्री देव पिंपळ मारुती मंदिर व्यवस्थापन आणि उभा बाजार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.











