
दोडामार्ग : मणेरी येथील श्री सातेरी पंचायतन देवीचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि 16 मे रोजी संपन्न होणार आहे.
या निमित्त सकाळी 09 वाजता देवदेवतांवर अभिषेक, होमहवन, दुपारी 1.30 वाजता आरती, महाप्रसाद, सायंकाळी भजन, 6.30 वाजता गोव्यातील नामवंत कलाकारांचे सुश्राव्य भजन होणार आहे. रात्री 9.30 वाजता गोवा मोर्जी येथील संगीत लावणी भुलली अभंगाला ही नाट्यकृती होणार आहे. तरी सर्व भाविक व रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सातेरी देवस्थान समितीच्यावतीने करण्यात आले आहे.