
देवगड : देवगड येथून कट्टा येथे रिक्षाने रिक्षाचालक अक्षय विवेक किर वय 27 राजेश विष्णू शेडगे वय 50 श्लोक शेडगे वय १० व आदेश नागेश करंगुटकर १२ हे रिक्षाने कट्टा येथे घरी जात होते. मात्र, त्याच वेळेस नांदगावहून देवगडच्या दिशेने येत असलेल्या स्कार्पियोची जोरदार धडक रिक्षाला बसल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले. कट्टा भंडारवाडी येथील धोकादायक वाहनावर हा अपघात झाला या अपघातात रिक्षामधील दहा वर्षाचा मुलगा श्लोक स्वर्गी याला मुका मार लागला तर बारा वर्षाच्या आदेश नागेश करंगुटकर यांच्या डोक्याला डाव्या डोळ्याच्या वरती जखम झाली आहे तर रिक्षा चालक अक्षय विवेकी किर वय 27 याच्या डोक्याला उजव्या हाताला डाव्या हाताला डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे देवगड ग्रामीण रुग्णालय येथे त्याच्यावर उपचार करून पुढे हलविण्यात मात्र या अपघातातील प्रवासी राजेश विष्णू शेडगे वय 50 यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले आहेत .
ठाणे बदलापूर येथे राहणारे राजेश विष्णू शेडगे हे 17 मे रोजी आपल्या गावात गोंधळाचा कार्यक्रम असल्यामुळे आज सकाळीच ते बदलापूर होऊन गावी आले होते.देवगडचे उप पोलीस निरीक्षक विनायक केसरकर प्रवीण सावंत विश्वनाथ महाडिक वाहतूक पोलीस विशाल वैजल यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही.