वैभववाडीत उद्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

आ. नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 11, 2024 18:51 PM
views 140  views

वैभववाडी : वैभववाडी तालुका स्तरीय दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन कोकीसरे येथील माधवराव पवार विद्यालयात दि.१२व १३डिसेंबरला आयोजित करण्यात आले आहे. आम.नितेश राणेंच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

 शैक्षणिक वर्ष सन२०२४-२५चे तालुकास्तरीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे ५२ वे विज्ञान प्रदर्शन कोकीसरे येथे होत आहे.याच उद्घाटन सकाळी ११वा.स्था निक आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, प्रमुख उपस्थिती महालक्ष्मी शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रभाकर वळंजू, दत्तात्रय पवार, रविंद्र नारकर, प्रभारी सरपंच समिक्षा पाटणकर, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, मुख्याध्यापक शिवदास कदम आदी उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ११वा‌. उद्घाटन, दुपारी १२वा . निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, दुपारी २.३०वा.प्रश्नमंजुषा (मोठा गट), दुसऱ्या दिवशी (१३डिसेंबर) सकाळी ९.३०ते २.३०प्रतिकृती परीक्षण, सकाळी १०वा.वक्तृत्व स्पर्धा (मोठा गट), दुपारी १२वा.प्रश्नमंजुषा (लहान गट), दुपारी ३वा बक्षिस वितरण समारंभ व समारोप होणार आहे. या कार्यक्रमासाठी विज्ञान प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.