
देवगड : देवगड जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर या ठिकाणी देवगड तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धासंपन्न झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन अजित गोगटे (माजी आमदार. देवगड ) यांचे हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक- शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल देवगड. द्वितीय क्रमांक- श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे. तृतीय क्रमांक- पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय पेंढरी. या विद्यार्थ्यांचे सत्कार प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन.प्रसाद मोंडकर.शाळा समिती अध्यक्ष. (श्री. मो. गोगटे हायस्कूल जामसंडे )यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रसाद मोंडकर ( शाळा समिती अध्यक्ष ), .सत्यपाल लाडगावकर. ( संघटक सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ ),सतीशकुमार कर्ले. ( अध्यक्ष देवगड तालुका विज्ञान मंडळ ). प्रा. विमल बलवान (स. ह. केळकर कॉलेज देवगड). या स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रकाश ढाले सर (मु. वा. फाटक. नर्सिंग कॉलेज जामसंडे ), ऋत्विक धुरी आनंदवाडी. देवगड (नाट्य अभिनेता )अनिरुद्ध नारिंगरेकर, नारिंगरे. (लेखक, दिग्दर्शक ) आदी उपस्थित होते.