
सिंधुदुर्ग : शाळा दुरुस्तीचा मुद्दा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नियोजन सभेत उपास्थित केला. यावर संतापलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. पैसे आणि पैशाचा योग्य विनियोग करणे गरजेचे आहे. असे असताना निधी खर्च का नाही केला ? कामे अपुरी का ठेवलात ? इथे टाईमपासला येता का ? अशा शब्दात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना सुनावले. पैसे देत असताना जर निविदाप्रक्रिया होत नाही, बाहेरून अंदाजपत्रक काढता आम्हाला काय कळत नाही ? आम्ही वेडे आहोत का ? असा सवाल करत सखोल चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री चव्हाण यांनी दिले.