
वेंगुर्ला : जि. प. सिंधुदुर्ग यांच्या "शेतीच्या बांधावरील शाळा" या उपक्रमांतर्गत पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नं. ४ येथील पहिली ते सातवीच्या ८० विद्यार्थ्यांनी राऊळवाडा येथे पारंपरिक पद्धतीने शेतीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी भाताची लावणी, तरवा काढणे, चिखल करणे यांचा अनुभव घेतला. शेतीतील अवजारे, यंत्रसामग्री आणि ट्रॅक्टर याविषयी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना शेतीशी प्रत्यक्ष परिचय करून देण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
शालेय जीवनातच शेतीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरला.
कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती बेहरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित राऊळ, उपाध्यक्ष हर्षद परब, माजी अध्यक्ष व शिक्षणप्रेमी वासुदेव उर्फ बाळा परब, मेघना राऊळ, पदवीधर शिक्षक संतोष परब, उपशिक्षक सुधर्म गिरप सानिका कदम, युवा प्रशिक्षणार्थी नेहा परब, अंगणवाडी सेविका नयना आरेकर, मदतनीस सत्यभामा गावडे, तसेच पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता-पालक संघ व शिक्षक- पालक संघ सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीविषयक ज्ञान, अनुभव व ग्रामीण जीवनाची जाण मिळाली.