
सावंतवाडी : कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविला जातो. यावर्षी ही आतापर्यंत सिंधुदुर्ग, पुणे, बीड,अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगड सह अनेक जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न झाले. याच वाटपाचा भाग म्हणून आज श्री माउली विद्यामंदिर डोंगरपाल येथे ३१ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेलं शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवला जातो. अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळे मुलांना पुस्तके, वह्या, पेन यांसारख्या मूलभूत गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचा अभ्यासातला रस कमी होतो हे लक्षात घेऊन कोकण संस्था दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना मोफत शालेय किट्स वितरित करून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य करते.
आताच ११ जूनला सावंतवाडी येथे ५१ शाळातील ८५५ गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. २०१० मध्ये स्थापन झालेली ‘कोकण कला व शिक्षण विकास संस्था’ शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांद्वारे वंचितांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत आहे.
या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते जयेश सावंत, अमित गवस, सागर कुबल, अक्षय गवस,आरोही गवस, श्री माउली विद्यामंदिर डोंगरपाल संस्था सचिव नारायण सावंत, खजिनदार गुणाजी गवस, दीक्षा बांदेकर, रीना गाड सह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष वावळीये सर यांनी तर आभार संस्था उपाध्यक्ष विलास सावंत यांनी मांडले
"स्कुल किट मुळे शिक्षणाची वाट सुरळीत होईल, कोकण संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जो शैक्षणिक आधार उभा करत आहे, तो अत्यंत प्रशंसनीय आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत, मी हि मराठी शाळेचा विद्यार्थी असून शाळेच्या कार्यात मी कायम सहकार्य करेन
सामाजिक कार्यकर्ते विशाल परब