
दोडामार्ग : कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविला जातो. यावर्षी हि आतापर्यंत सिंधुदुर्ग, पुणे, बीड,अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगड सह अनेक जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न झाले असून याच वाटपाचा भाग म्हणून आज जि.प.पु.प्रा. शाळा असनिये येथे २० शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सक्षम कोकण संस्था असनिये यांच्या पुढाकारातून ये साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेलं शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवला जातो. अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळे मुलांना पुस्तके, वह्या, पेन यांसारख्या मूलभूत गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचा अभ्यासातला रस कमी होतो हे लक्षात घेऊन कोकण संस्था दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना मोफत शालेय किट्स वितरित करून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य करते.
स्कुल किट मुळे ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा स्तर उंचावण्यास मदत होईल असे मत असनिये गावच्या सरपंच सौ. रेश्मा सावंत यांनी मांडले.
या कार्यक्रमाला सक्षम कोकण संस्थेचे जितेंद्र सावंत, माजी उपसरपंच चंदन नाईक, सदस्य सुमंत असनियेकर, अंगणवाडी सेविका साक्षी सावंत, विकास सावंत, भिकाजी सावंत, भिकाजी नाईक, शैलेश सावंत, सोहम सावंत, विलास नाईक,भूषण सावंत मुख्याध्यापक सुनील गवस मुख्याध्यापक सुनील गवस सह शिक्षिका स्वाती गवस,कस्तुरी बैस, स्वाती असनियेकर, सुहास सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.