
वैभववाडी : आचिर्णे कडूवाडी येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आज या इमारतीची प्रभारी गटशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद बांधकामचे अधिकारी यांनी पाहणी केली. दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
या इमारतीची तात्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी येथील ग्रामस्थांनी आज गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता. तसेच माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून इमारत दुरुस्तीची मागणी केली. अखेर या साऱ्या प्रकारानंतर प्रशासनाने दखल घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.