
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, यांचेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथ. (इ.५वी) शिष्यवृत्ती व पूर्व माध्य. (इ. ८ वी) शिष्यवृत्तीमध्ये एस. एम. हायस्कूल, कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करीत या प्रशालेची यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे. इ.५ वी शिष्यवृत्तीधारक डेलिशा संदीप सावंत, श्रीराज प्रसन्न सावंत,सान्वी सुरेश जाधव, शाश्वत शशिकांत तांबे तसेच ८ वी शिष्यवृत्तीधारक मुग्धा विकास साईल, भार्गव भरत काणेकर, एन.एन.एम.एस. परीक्षेमध्ये साहिल लक्ष्मण पवार या सर्व गुणवंतांचा कणकवली शिक्षण संस्था, कणकवलीचे डॉ. एस.एन. तायशेटे (चेअरमन) डी.एम. नलावडे (सचिव) डॉ. संदीप सावंत (उपचेअरमन ) एम.ए. काणेकर (उपचेअरमन) जी. एन. बोडके (मुख्याध्यापक) यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. एस. एन. तायशेटे व डी. एम. नलावडे यांनी शिष्यवृत्तीधारक गुणवंत मुलांचा सत्कार करताना, अशाच प्रकारे आपल्या प्रशालेची उज्ज्वल यशाची परंपरा अबाधित ठेवण्याबाबत आवाहन केले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले. या सर्व गुणवंत मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एन. के. केसरकर, एस. एम. पवार व इतर शिक्षक वृंदांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमास एस. एम. हाय. कणकवलीचा शिक्षक वृंद, पालक व अनेक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. सी. गरगटे व आभार आर. एल. प्रधान (उपमुख्याध्यापक) यांनी मानले.