
देवगड : देवगड येथील शिरगांव हायस्कूल शिरगांव मध्ये इयत्ता ९ वीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या १० विच्या शैक्षणिक खर्चासाठी माऊली फाउंडेशन, सोलापूर यांच्या तर्फे पंधरा हजार शिष्यवृत्ती २६ जानेवारी च्या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी जाहीर केली होती.
त्यानुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ९ वी मधून प्रथम क्रमांकाने उतीर्ण झालेली विद्यार्थिनी कुमारी स्वराली सागर मेणे हिला शाळेत माऊली फाउंडेशन,सोलापूर ट्रस्ट चे अध्यक्ष संदीप कांबळे यांच्या हस्ते रोख रु १५०००/- देऊन शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. कुमारी स्वराली मेणे हीचे अभिनंदन यावेळी करण्यात आले. तसेच माउली फाउंडेशन सोलापूर यांचे शाळा व संस्थे तर्फ मुख्याध्यापक शिरगांव हायस्कूल यांनी आभार देखील यावेळी मानले.