
देवगड : महिला दिनानिमित्त पंचायत समिती देवगडमध्ये महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने मा . गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांच्या संकल्पनेतुन अनेक कार्यक्रमांचे आयोजन पंचायत समिती देवगडमध्ये करण्यात आले.
सकाळच्या सत्रात पाककला स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये प्रथम क्रमांक सायली बिर्जे ( मिठबांव ) , द्वितीय क्रमांक युवश्री पराडकर , तृतीय क्रमांक प्राची जाधव (जामसंडे) तर उत्तेजनार्थ १ सीमा बोडेकर (दाभोळे )उत्तेजनार्थ २ सीमा कुंभार यांनी पटकावला . प्रथम क्रमांक २००० रुपये व भेटवस्तु , द्वितीय क्रमांक १००० रुपये व भेटवस्तु , तृतीय क्रमांक ५०० रूपये व भेटवस्तु उत्तेजनार्थ २५० रू .व भेटवस्तु या सर्व बक्षिसाचे प्रायोजक पशुधन अधिकारी डॉ . माधव घोगरे व त्यांच्या पत्नी आशा पौळ / घोगरे मॅडम यांनी केले .विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले .पाककला स्पधेसाठी परीक्षक म्हणून अस्मिता मकरंद लळीत मॅडम व श्रृती श्रीरंग पाटणकर मॅडम यांनी परीक्षण केले. संध्याकाळच्या सत्रात सर्वांच लक्ष लागलेल्या खेळ पैठणीचा या खेळात मानाची पैठणीची मानकरी ठरली वेदिका साटम तर उपविजेती ठरली महिला भजनी बुआ गौरी ठुकरूल तर तृतीय क्रमांक रिया भुजंग अनभवणे तर चतुर्थ क्रमांक नेहा साटम हिने पटकावला . या सर्व विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
दुपारच्या सत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला . त्यामध्ये बासरी वादक शेठ म. ग . हायस्कुल विदयार्थीनी राज्ञा कुळकर्णी , महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका देवगडकर ,सहाय्यक अभियंता महावितरण छाया परब , डॉक्टर सावली बोभाटे , वकील अॅड . संगिता कालेकर, वरिष्ठ लिपिक देवगड आगार कुंदा गोलतकर , पोलीस पाटील तळेबाजार मानसी माणगांवकर ,कराटे चॅम्पीयन शेवंता नाईक , आशा स्वंयसेविका समीक्षा लाड , बचत गट महिला अर्पना सकपाळ, आरोग्य सेविका साळशी अर्पणा इंदप , अंगणवाडी सेविका नयना वाडेकर , आरोग्य सहाय्यीका मदतनीस उषा मोहिते ( ताई ) , महिला भजनी बुआ गौरी ठुकरूल, हॉटेल व्यवसायिक ममता धुपकर , ग्रामपंचायत अधिकारी पल्लवी कळकंकर , तसेच जि.प आदर्श शाळा जोशी विद्यामंदीर जामसंडे नं१ शाळेचे विदयार्थी ज्यानी बंगलोर म्हैसुर ( इत्रो ) अभ्यास दौरा यशस्वी केला असे विद्यार्थी कु . भावना सचिन आयरे तसेच कु .मंथन सुशिल आयरे आदींचा शाल,प्रमाणपत्र व भेटवस्तु देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपिठावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ . उमेश पाटील , माजी सभापती सुनिल पारकर ,पशुधन विकास अधिकारी डॉ . माधव घोगरे , आशा पौळ / घोगरे, महिला पोलीस कॉन्टेबल प्रियांका देवगडकर , सहाय्यक अभियंता महावितरण छाया परब , बांधकाम शाखा अभियंता अनिल तांबे , आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) श्री अंकुश जंगले , विस्तार अधिकारी श्रारंग काळे , प्रसाद मिरजकर , दत्तगुरू सांगळे , राहुल मिठबांवकर , दिपक मयेकर , उत्तम मोहिते सर, . हेमांग पाटील, मधुसुदन घोडे सर , स्वप्नजा बिर्जे , मेधा राणे यांचे विशेष सहकार्य लाभले.