
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. गोविंदरावजी निकम यांच्या खांद्याला खांदा लावून संस्था नावारूपाला आणण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांच्यातील अष्टपैलूत्व अनेक प्रसंगांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष कार्याद्वारे सिद्ध केले.पगारातील काही भाग त्या गरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च करत होत्या. त्यांच्या "अमृताची बोटे"या कवितासंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी कोकणच्या वास्तव जीवनाचे वर्णन केले आहे. महान व्यक्तींच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करताना त्यांचे कार्य समजून घेऊन ते अंगीकारणे आवश्यक आहे असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्व.अनुराधाताई निकम यांचा स्मृतिदिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या माऊली स्व. अनुराधाताई निकम यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्व. अनुराधाताई निकम यांच्या जीवनावर आधारित शिल्पा राजे शिर्के व वैभवी भुवड यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थी मनोगतात श्रावणी राठोड व कृपा देडगेने स्वर्गीय अनुराधाताई निकम यांच्या संघर्षमय जीवनाची कथा विद्यार्थ्यांच्या समोर उभी केली.त्यांच्या 'अमृताची बोटे'या कवितासंग्रहातील कवितांचे सादरीकरण कु. मणिकर्णिका गुडेकर व सहकाऱ्यांनी केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांनी केले होते यामध्ये साक्षी गोरे ने निवेदन केले तर कोमल पंडित ने उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी भिक्तीपत्रकाचे उद्घाटन करताना उपप्राचार्य विजय चव्हाण व सहकारी