
सावर्डे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने एस. व्ही. जे. सी. टी. डेरवण येथे नुकत्याच जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेच्या 19 वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल संघाने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला.
या संघात आरती मकाळे, समृद्धी पाष्टे, अवंती नरळकर, समीक्षा जयस्वाल, श्रेया जाधव, यशस्वी पवार, प्रिया पवार, प्रचिती भारती, जागृती ओकटे, आर्या गुजर, अमृता पिरधनकर, स्वरूपा कुसळकर आणि अनुष्का गोरीवले या खेळाडूंनी चमकदार खेळ सादर केला. खेळाडूंना दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थिनींचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सचिव महेश महाडिक, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
यशस्वी फुटबॉलपटूंचे अभिनंदन करताना मार्गदर्शक शिक्षक दादासाहेब पांढरे व अमृत कडगावे










