सावंतवाडीच्या प्रथमेश गावडेची महाराष्ट्राच्या 23 वर्षाखालील क्रिकेट संघात निवड

Edited by: विनायक गावस
Published on: October 21, 2023 19:43 PM
views 247  views

सावंतवाडी : भारतीय क्रिकेट नियमक मंडळ आयोजित 23 वर्षाखालील एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथमेश गावडे याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. या अगोदर महाराष्ट्राच्या 19 वर्षाखालील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रथमेश गावडे यांनी चांगली कामगिरी केली होती. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजीच्या जोरावर त्याची राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमी मध्ये निवड झाली होती. प्रथमेश गावडे हा मूळ आंबोली गावाचा सुपुत्र क्रिकेटचा सराव करण्यासाठी सावंतवाडी मध्ये स्थायिक प्रथमेश यांनी क्रिकेटचे धडे आपल्या वयाच्या चौदाव्या वर्षापासून अबू  भडगावकर यांच्याकडे घेतले.

सावंतवाडीत सुनील नाईक अकॅडमी मध्ये ते अबू भडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव घेत आहे. रमेश याच्या अभिनंदन निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन आणि सुनील नाईक क्रिकेट ॲकॅडमी यांनी शुभेच्छा दिल्या सुनील नाईक क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष सीए सुधीर नाईक सर यांनी प्रथमेश याला पुढील वाटचाल साठी  शुभेच्छा दिले.