
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सुप्रसिद्ध वैद्य डॉ. श्रीपाद जनार्दन कशाळीकर, वय ८९ यांचे शनिवारी दुपारी दुःखद निधन झाले. माठेवाडा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सालईवाडा येथील दवाखान्यात गेली अनेक वर्षे त्यांनी सावंतवाडीकरांना वैद्यकीय सेवा दिली. अनेकांचे ते फॅमिली डॉक्टर होते. साहित्य, संगीताची त्यांना विशेष आवड होती. गुणकारी डॉक्टर असल्याने पंचक्रोशीतील रूग्ण त्यांच्याकडे येत. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातही त्यांनी वैद्यकीय सेवा दिली. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
त्यांच्या पश्च्यात पत्नी, भाऊ, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. सुबोधन कशाळीकर, मेडिकल व्यावसायिक मकरंद कशाळीकर व अनिरुद्ध कशाळीकर यांचे ते वडील होत