रेल्वे टर्मिनससाठी सावंतवाडीकरांची वज्रमूठ..!

टर्मिनस कृती समिती व प्रवासी संघटनेची स्थापना..! मंत्री दीपक केसरकर आता गप्प का? : अँड. संदीप निंबाळकर
Edited by: विनायक गावस
Published on: November 26, 2023 17:47 PM
views 677  views

सावंतवाडी :  सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातील प्रवासी, नागरिक व व्यापाऱ्यांच्या उपस्थित चर्चा करून सावंतवाडी टर्मिनस कृती समिती व प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी अँड. संदीप निंबाळकर तर सचिवपदी मिहीर मठकर यांची एकमतानं नियुक्ती करण्यात आली. यावेळी मुडरा अन् सावंतवाडी टर्मिनसच्या वादाप्रसंगी प्रतिष्ठेचा मुद्दा करणारे विद्यमान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर सत्तेत आल्यापासून रेल्वे टर्मिनसप्रश्नी गप्प का ? तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भुमिपूजन झालेल्या सावंतवाडी टर्मिनसचं पुढे काय झालं ? असा सवाल संदिप निंबाळकर यांनी केला. कोकण रेल्वेकडून सावंतवाडीवर होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही. सावंतवाडीच्या हक्काच्या बंद केलेल्या रेल्वे गाड्यांसह टर्मिनस पूर्णत्वास आलच पाहिजे असं मत अँड. निंबाळकर यांनी व्यक्त केल. श्रीराम वाचन मंदिरमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते.

ते म्हणाले, कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून आठ वर्षांपूर्वी भूमिपूजन केले. पण अजूनही रेल्वे टर्मिनस साकारले नाही. मडुरा की सावंतवाडी हा वाद सुरु असताना प्रतिष्ठेचा मुद्दा करणारे विद्यमान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आता गप्प का आहेत ? रेल्वेनंतर राज्य महामार्गही शहराच्या बाहेरून गेला आहे. त्यामुळे त्याचा मोठा फटका शहराच्या विकासाला बसला आहे. आताच्या राजकारणी लोकांचा हा फसवा फसवीचा धंदा जनतेला बंद करावा लागेल. टर्मिनस प्रश्नी आता गप्प न बसता सावंतवाडीच्या हक्काच्या बंद केलेल्या रेल्वे गाड्यांसह टर्मिनस पूर्णत्वास आलच पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर पुढाऱ्यांकडून ते पूर्ण करून घेतल पाहिजे असं अँड. निंबाळकर म्हणाले.

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, मडुरा, सावंतवाडी टर्मिनसच्या वादात मी घेतलेल्या भुमिकेमुळे राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. टर्मिनस होण, एक्स्प्रेस गाड्यांना सावंतवाडीत थांबा मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घ्यावा लागला तरी बेहत्तर पण आमच्या हक्काचं आम्हाला मिळायलाच हवं असं ते म्हणाले. महिला नेत्या अर्चना घारे-परब यांनी देखील या लढ्याला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केलं. सर्वांनी एकजुटीने लढा देऊ असं त्या म्हणाल्या. यावेळी अभिमन्यू लोंढे, अँड.नकुल पार्सेकर, नंदन वेंगुर्लेकर, रमेश बोंद्रे, चंद्रकांत बांदेकर, पुंडलिक दळवी आदींनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. कोकण रेल्वेकडून सावंतवाडीकरांचा झालेला अपमान हा आमच्या राजकीय नेत्यांचाही अपमान आहे. निदान त्या अपमानानंतर नेत्यांनी जागं व्हावं. कुडाळ, कणकवलीतील लोकप्रतिनिधींच्या मागण्यांना यश मिळत असेल तर सावंतवाडीच घोड कुठं अडतय ? असा सवाल त्यांनी केला. 

याप्रसंगी सावंतवाडी टर्मिनस कृती समिती व प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली. अध्यक्षपदी अँड. संदीप निंबाळकर, उपाध्यक्ष जगदीश मांजरेकर,अँड. नकुल पार्सेकर, नंदन वेंगुर्लेकर, सिद्धेश सावंत, विनायक गांवस, सागर नाणोसकर, सागर तळवडेकर, खजिनदार रविंद्र ओगले, सहखजिनदार विहंग गोठोस्कर, सचिव मिहीर मठकर, सहसचिव अँड.‌सायली दुभाषी, तालुका / ग्राम संपर्क प्रमुख भुषण बांदिवडेकर, महिला संघटना अध्यक्षा अर्चना घारे-परब, सल्लागार समितीत रफिक मेमन, समिर वंजारी,अभिमन्यू लोंढे,रविंद्र बोंद्रे, बबन साळगावकर,बाळासाहेब बोर्डेकर, शेखर पाडगांवकर, पुंडलिक दळवी,भाई देऊलकर, महेश परूळेकर, बाबल वाडकर,सुभाष शिरसाट,हिदायतुल्ला खान, देव्या सुर्याजी तर प्रेस मिडिया हेड अमोल टेंबकर, सोशल मिडिया हेड  सागर तळवडेकर,भूषण बांदिवडेकर, समिर घोंगे शिष्टमंडळ अध्यक्ष चंद्रकांत बांदेकर, उपाध्यक्ष तेजस पोयेकर, सागर तळवडेकर, केशव नाईक तांत्रिक सल्लागार सागर तळवडेकर, सदस्य मंदार सहस्त्रबुद्धे, सचिन नाईक, गौरव पेडणेकर,प्रथमेश पाडगांवकर,प्रदीप चिटणीस,नागराज पाटील,महेश हरमलकर,साईनाथ शिरसाट,शरद गावडे आदिंची निवड करण्यात आली.

माजी आमदार कै.जयानंद मठकर, पर्यटन तज्ञ कै. डी.के. सावंत यांच्या नेतृत्वाखाली या आधी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं आपल्या मागण्यांसाठी लढा दिला होता. प्रवाशांच्या प्रश्नांसाठी दिल्ली हलवली होती. रखडलेलं रेल्वे टर्मिनस व जादा गाड्यांच्या थांब्यासाठी येत्या २६ जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सावंतवाडीकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आल.

याप्रसंगी  सिद्धेश सावंत, जगदीश मांजरेकर, रविंद्र ओगले, शफीक मेमन, साईनाथ शिरसाट, सुभाष शिरसाट, साहिल नाईक, बाबल वाडकर, प्रथमेश पाडगांवकर, भुषण बांदिवडेकर, विहंग गोठस्कर, समीर वंजारी, तेजस पोयेकर, वैभव परब, अमोल टेंबकर, हिदायतुल्ला खान, तरबेज बेग, चंद्रकांत बांदेकर, शेखर पाडगांवकर, सत्यवान साटेलकर आदी उपस्थित होते.