कोकण रेल्वेकडून सावंतवाडीकरांचा अपमान : मिहिर मठकर

२६ जानेवारीला साखळी आंदोलनाचा इशारा
Edited by:
Published on: November 17, 2023 14:40 PM
views 468  views

सावंतवाडी : कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता सावंतवाडी रेल्वे स्थानकात आले होते. यावेळी सावंतवाडी रेल्वेटर्मिनस प्रेमी मिहीर मठकर यांनी त्यांची सावंतवाडी रेल्वे स्थानकावर भेट घेतली. यावेळी कोरोना बंद केलेल्या रेल्वे गाड्यांना सावंतवाडीत थांबा देण्यासह सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच काय झालं ? असा सवाल त्यांनी सीएमडींनी केला. तर याबाबतच निवेदन त्यांना देण्यात आले.

याप्रसंगी सावंतावडीकरांचा नेहमी कोकण रेल्वेकडून अपमान केला जातो. राजधानीच तिकिट सावंतवाडीकरांना परवडणारी नाही. प्रीमियम गाड्या तुम्हाला परवडणाऱ्या नाही अस कोकण रेल्वेकडून सांगून सावंतवाडीकरांचा अपमान केला होता. आजही कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष स्व.डी के सावंत यांचा अपमान सीएमडींनी केला. डी.केंं.नी आंदोलन केली त्याच पुढे काय झालं ? असं ते म्हणाले. त्यामुळे येत्या २६ जानेवारीला सावंतवाडी करांच्या मागण्यांसाठी कोकण रेल्वे विरूद्ध साखळी आंदोलन करणार असल्याचा इशारा मिहीर मठकर, भुषण बांदिवडेकर यांनी दिलाय.