
सावंतवाडी : वन परिक्षेत्रातील चराठे येथील शासकीय वनात अज्ञात इसम तोड करुन माल फरार करण्याच्या प्रयत्ना असल्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चराठे येथील शासकीय वनात दबा धरुन बसल्यानंतर एक वाहन संशयितरित्या जात असलेचे वन अधिकारी यांचे निर्दशनास आले. यावेळी वाहन थांबविणेचा प्रयत्न केला असता वाहन न थांबविता निघून जात असता पाठलाग करुन हे वाहन चराठे येथे अडवून तपासणी केली असता या वाहनात अवैध रित्या वाहतुक करीत असलेले साग लाकूड आढळुन आले.
हे वाहन भानुदास देसाई (रा माजगांव हरसावंतवाडा) यांच्या मालकीचे आयशर क्रमांक एमएच 07 पी 3258 असुन आरोपी सावंतवाडी वन विभागाचे मालकीचे चराठे वनामध्ये अपप्रवेश करुन साग झाडांची तोड करुन तयार केलेला माल बेकायदेशीर रित्या रात्रीचावेळी वाहतुक करीत असता वाहन मालासह जप्त करुन विक्री आगारात जमा केले. याप्रकरणी आरोपी भानुदास देसाई यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी करता गुन्ह्यात त्याचा भाऊ भुषण देसाई आढळुन आला. त्यांना रहात्या घरातुन ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता घरामध्ये तयार सोफासेट 1, खुर्चा-2, टिपॉय, साग गोल नग 6 व चिरीव नगाचा अवैध साग मालाचा साठा आढळून आला. तोही जप्त करण्यात आला आहे. गुन्हयामध्ये तिसरा आरोपी असुन त्याचा शोध वन विभागा घेत आहे. या गुन्हा प्रकरणी आरोपी यांना ताब्यात घेऊन भारतीय वनअधिनियम 1927 वे कलम 26 (1 ई, फ) व 41 (2) ब अन्वये गुन्हा नोंद करणेत आलेला आहे. आरोपी यांना न्यायालय सावंतवाडी येथे हजर केले असता आरोपींना न्यायालयाने 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, वैभव बोराटे सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदशनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील सावंतवाडी यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी वन परिक्षेत्रातील, प्रमोद राणे वनपाल माजगांव, अक्षय कुंभार वनरक्षक कोलगांव उत्तर, सुशांत चोथे वनरक्षक माजगांव, व सुनिल गडदे वनरक्षक मळगांव उत्तर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.










