सिंधुदुर्गात होतेय पतसंस्थांचे पहिलेच २ दिवसीय भव्य अधिवेशन

आंबोलीत २३ मे रोजी उद्घाटन ; पतसंस्थांचा होणार सन्मान
Edited by: विनायाक गांवस
Published on: May 18, 2026 21:49 PM
views 198  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याच्या सहकार कायद्याअंतर्गत नोंदणी असणा-या सहकारी पतसंस्थांचे दोन दिवशीय भव्य अधिवेशन आंबोली येथे आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पतसंस्थांचे असे भव्य अधिवेशन संपन्न होत असून हे अधिवेशन विविध कारणांनी वैशिष्ठ्यपूर्ण ठरणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी दिली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या नागरी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था व पगारदार पतसंस्था अशा विविध १५० पतसंस्था कार्यरत आहेत. यामध्ये अनेक पतसंस्था ह्या आपले आर्थिक व्यवस्थापन उत्तम प्रकारे करत असून ज्या संस्थाची ५ कोटी पेक्षा जास्त खेळते भागभांडवल सिंधुदुर्ग मध्ये उभे केलेले आहे. अशा सर्व सहकारी पतसंस्थाना या अधिवेशनामध्ये गौरव प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विविध संस्थांना गौरविण्यात येणार आहे. तसेच या अधिवेशनासाठी सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर, कुडाळ मालवण संघाचे आमदार निलेश राणे त्यांचे हस्ते सुध्दा संस्थांना गौरव प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. सहकारी पतसंस्थांची ही चळवळ अधिक वृध्दीगंत व्हावी व सर्वसामान्यांना ती आधारभुत ठरावी व त्यांनी अधिक जोमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला कार्य विस्तार करावा, या उ‌द्देशाने पतसंस्था फेडरेशनच्यावतीने त्यांना गौरविण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहितीही सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी केली आहे.

या अधिवेशनामध्ये पतसंस्थांनी आपले आर्थिक व्यवस्थापन उत्तम प्रकारे करावे, विविध कायदे, नियम यांचे अवलोकन करावे, भविष्यात भेडसावणा-या समस्या याविषयी विचारविनिमय करावा या सर्व उद्देशाने अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नव्याने लागू झालेला आदर्श उपविधी या विषयावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे हे खास मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पतसंस्थाना कर्ज वितरण व कर्ज वसुलीमध्ये ज्या अनेक समस्या उद्भवतात, यावर पुणे येथील आर. बी. यादव हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सायबर क्राईमचा वाढता धोका ओळखता यावर पुंडलिक सातोसे हे मार्गदर्शन करणार आहेत. भविष्यामध्ये पतसंस्थासमोर कोणती आव्हाने उभी राहतील व त्यावर कोणती उपाययोजना करता येईल, यावर महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ताणतणाव व्यवस्थापन यावर पुणे येथील योगा तज्ञ व योग अभ्यासक अशोक देशमुख हेही मार्गदर्श न करणार आहेत. संपुर्ण दोन दिवसांच्या अधिवेशनामध्ये संस्थेचे चेअरमन, संचालक, व्यवस्थापकीय कर्मचारी आदि उपस्थित राहणार असून या सर्वाना यामध्ये मार्गदर्शन शिविराचा लाभ होणार असल्याची माहिती सुनिल राऊळ यांनी दिली आहे. सहकारी पतसंस्थांनी ही चळवळ संपुर्ण राज्यात गावामध्ये व शहरामध्ये विखुरलेली असून या चळवळीमध्ये अनेक नेतृत्व कार्यरत आहेत. ही चळवळ अधिक सक्षम व्हावी अधिक कार्यतत्पर राहावी व जनतेच्या सर्व सामान्याच्या विश्वासाला पात्र ठरावी. म्हणुन विविध पातळीवर अशी नेतृत्व काम करत आहेत. यामध्ये कार्यरत असणारे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष ॲड. दिपक पटवर्धन, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलालजी सिंगी (छत्रपती संभाजी नगर) संचालक श्री. सुदर्शनराव भालेराव, (बुलढाणा), कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष श्री. गिरिश तुळपुले (अलिबाग), असे सहकार चळवळीतील अग्रेसर नेतृत्व या अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत व मार्गदर्शन करणार आहेत. आंबोली येथे दोन दिवशीय अधिवेशन चालणार असून, या अधिवेशनामध्ये पतसंस्था समोरील आव्हाने, संगणकीय तंत्रज्ञान नव्यानेच कार्यरत होणार ए आय तंत्रज्ञान व एकंदरीतच या चळवळीमध्ये उभी असणारी विविध आव्हाने यावर खुले चर्चा सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. अशा चर्चा सत्राच्या माध्यमातुन पतसंस्थाना अधिक बळकटी देणे, योग्य दिशेने त्यांचे मार्गक्रमण होणे ही काळाची गरज असुन, पतसंस्था फेडरेशन हे या सगळ्याकडे एक अभ्यासपुर्ण अधिवेशन म्हणुन पाहत आहे. यातुनच शासन स्थरावर ज्या काही समस्या उद्भवतात अशांचा सांगोपांग विचार करून त्या सोडवण्यासाठी हे फेडरेशन कार्यरत राहणार असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनिल राऊळ यांनी दिलेली आहे. हे अधिवेशन घेण्याचे धाडसी पाऊल हे पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाने घेतले, ही स्तुत्य वाव आहे. फेडरेशनवर सध्या कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, उपाध्यक्ष नंदकिशोर कोरगांवकर, उपाध्यक्ष सुनिल नाईक, संचालक बाबुराव कविटकर, ॲड. समीर वंजारी, विष्णु पराडकर,. सुभाष चौधरी, तज्ञ संचालक रमेश बोंद्रे व सचिव. महेश्वर कुंभार हे कार्यरत आहेत. हे अधिवेशन सिंधुदुर्ग जिल्हयातील पतसंस्थासाठी ऐतिहासिक अधिवेशन असुन, त्यामध्ये जिल्हयातील पतसंस्थांनी मोठ्या संस्थेने सहभागी व्हावे, अशी विनंती सुनिल राऊळ यांनी केली आहे. त्याचबरोबर जिल्हयातील अनेक पतसंस्थानी अधिवेशन भरभक्कम व्हावे व पतसंस्थामधील विश्वास अधिक व्यापक व्हावा या उद्देशाने अनेक ठिकाणी जिल्हयामध्ये स्वागताच्या कमानी, स्वागताचे बॅनर हे उभारण्याचे आयोजन केले आहे. तसेच अनेक पतसंस्थानी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अधिवेशनासाठी आर्थिक मदतीचा हातभारही दिला आहे. तसेच दोन दिवसीय अधिवेशनासाठी अनेक वावी या संस्थांनी पुरस्कृत केलेल्या आहेत. या सर्वांना अध्यक्ष सुनिल राऊळ यांना धन्यवाद दिलेले असून आपण सर्वांनी एकसंघ होऊन हे अधिवेशन यशस्वी करावे, असे आवाहन पगारदार पतसंस्था, ग्रामीण नागरी पतसंस्था, ग्रामीण विगरशेती पतसंस्था यांना केले आहे. त्याचवरोवर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोपान शिंदे यांचे व सर्व सहाय्यक निबंधक कार्यालय या सर्वाचे विशेष सहकार्य सुध्दा लाभत असल्याची माहिती सुनिल राऊळ यांनी दिली आहे.