गो-सोर्सने सावंतवाडीत दिला २५ तरुणांना रोजगार

सिंधुदुर्गात ५ वर्षांत १,००० रोजगार निर्मितीचे लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: May 15, 2026 19:40 PM
views 486  views

सावंतवाडी : नवी मुंबई स्थित आघाडीची कंपनी गो सोर्सने सावंतवाडीत एक महत्तापूर्ण पाऊल उचलत तब्बल २५ स्थानिक तरुणांची नियुक्ती केली आहे. हा निर्णय केवळ रोजगार निर्मितीपुरता मर्यादित नसून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण निकासाच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल आहे.

गो सोर्सच्या या उपक्रमामुळे सावंतवाडीतील तरुणांना आता परगावी जाण्याची आवश्यकता न राहता स्व-गावातच उत्तम करिअरची संधी मिळाली आहे. अमेरिकन मॉर्गेज आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम आता सांतवाडीतूनच होणार आहे‌. जे या जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाचे आहे. सावंतवाडीतील या तरुणांनी आपल्या मर्यादा ओळखू नयेत तर त्या ओलांडाव्यात. आपल्या कामातून केवळ स्वतचाच नव्हे, तर संपूर्ण सावंतवाडी आणि सिंधुदु‌र्गाचा विकास साधावा. आपण एकट्याने सुरुवात केलेली प्रगती उद्या हजारो कुटुंबांचे जीवन बदलेल असा विश्वास गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे यांनी व्यक्त केला. नियुक्ती सोहळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कानसे यांनी नव्याने रुजू झालेल्या सर्व कर्मचान्यांचे स्वागत केले. त्यांनी प्रत्येक तरुणाला आशीर्वाद देत सांगितले की, आपल्या कामात नेहमी सर्वोत्तम द्या, स्वतःच्या मर्यादा तोडा आणि मोठे स्वप्न पहा असे आवाहन केले. श्री. कानसे यांनी या तरुणांना केवळ नोकरीचदिली नाही, तर त्यांना विश्वास दिला की ते देशाच्या आर्थिक विकासत बेट योगदान देत आहेत. पुढील ५ वर्षात गो सोर्स मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १,००० रोजगार निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट त्यांनी जाहीर केले आहे. या स्वप्नाची सुरुवात आज सावंतवाडीतील या २५ तरुणांपासून होत आहे.  ही कंपनी अमेरिकेतील मॉर्गेज आणि रिअल इस्टेट मूल्यांकन क्षेत्रातील अग्रणी म्हणून ओळखली जाते. नवी मुंबईच्या घणसोली येथे मुख्यालय असलेली ही कंपनी अता सवंतवाडीसारख्या शहरांमध्येही आपले जाळे विस्तारत आहे. यामुळे स्थानिक तरुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संधी त्यांच्या घरापासून जवळच उपलब्ध होत आहेत. संतोष कानसे यांच्या नेतृत्वाखाली गो सोर्स केवळ एक व्यावसायिक संस्था म्हणून नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था म्हणून काम करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांनी मुंबई, पुणे येथे स्थलांतर करण्याऐवजी स्व गावातच विकासाच्या संधी मिळाव्यात यासाठी गोसोर्स प्रयत्नशील आहे.