तळवडे येथील अपघातात दुचाकीस्वार ठार

Edited by: विनायक गांवस
Published on: May 15, 2026 21:57 PM
views 45  views

सावंतवाडी : नेमळे येथून तळवडे येथील आपल्या घरी परतत असताना दुचाकी खोल गटारात कलंडल्याने झालेल्या अपघातात गुरुनाथ सिताराम गावडे ( वय ६५,  रा. खेरवाडी, तळवडे ) यांचा जागीच मृत्यू झाला. नेमळे येथील ताडमाड परिसरात हा अपघात झाला. 

तर त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेली त्यांची पत्नी ज्योती गुरुनाथ गावडे ( वय ६० ) यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांनी तिला खाजगी वाहनातून सावंतवाडीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मनोज राऊत हे घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून त्यांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा या अपघाताबाबत सावंतवाडी पोलिसात नोंद करण्यात आली होती.