
सावंतवाडी : जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी आयोजित करण्यात आलेली एमआयएस (Management Information System) विषयक कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. सोपान शिंदे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिधुदुर्ग यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, सहाय्यक निबंधक, कुडाळ, सुनील मरभळ, लेखापरीक्षक नाईक, चौगुले, हिर्लेकर तसेच पतसंस्था फेडरेशनचे सचिव महेश्वर कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेत 'आपले सरकार' या ऑनलाईन पोर्टलवर लॉगिन, विविध ऑनलाईन सुविधांचा लाभ घेण्याची पद्धत, आदर्श उपविधी स्वीकारण्याची प्रक्रिया तसेच आवश्यक माहिती अपलोड करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय एमआयएस संदर्भातील माहितीचे महत्व वं अंमलबजावणी याबाबतही सखोल विवेचन करण्यात आले. यावेळी डॉ. सोपान शिंदे यांनी पतसंस्थांनी डिजिटल पद्धतीचा अवलंब करून पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन राबवावे असं आवाहन केलं.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे केलं गेलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फेडरेशनचे सचिव महेश्वर कुंभार यांनी तर आभार सहाय्यक निबंधक सुनील मरभळ यांनी मानले.










